1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न | Questions based on numbers from 1 to 100
1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न
* 1 ते 100 मध्ये, कोणता अंक किती वेळा येतो? दिलेला अंक असणा-या/नसणा-या संख्या? अंक असणा-या/नसणा-या 2 अंकी संख्या किती? याप्रकारचे प्रश्न येतात. या साठी विद्यार्थ्यांनी खालील तक्ता अभ्यासावा.
अंक |
0 |
1 |
2 ते 9 |
1 ते 100 मध्ये किती वेळा येतो? |
1 |
21 |
20 |
अंक दोन अंकी संख्यांमध्ये किती वेळा येतो? |
9 |
19 |
19 |
अंक असणा-या दोन अंकी संख्या किती? |
9 |
18 |
18 |
1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता,
1)
त्यांतील एक अंकी एकूण संख्या 9 आहेत ( 1 ते 9 )
2)
दोन अंकी एकूण संख्या 90 आहेत ( 10 ते 99 )
3)
त्यातील तीन अंकी एकूण संख्या 1 आहे ( 100 )
-------------------------------
1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण संख्या 10 आहेत.
( 10, 20,
30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 )
-------------------------------
एकक स्थानी 1 ते 9 यांपैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण 10 संख्या आहेत
1 ते 100 या संख्यामध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणा-या 9 संख्या आहेत. या सर्व संख्या 11 च्या पटीतील संख्या आहेत. ( 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99 )
त्याचप्रमाणे 12 च्या पटीतील 8 संख्या व 13 च्या पटीतील 7 संख्या आहेत.
-------------------------------
1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 50 सम संख्या व 50 विषम संख्या आहेत.
10 ते 99 या दोन अंकी संख्यांपैकी 45 सम संख्या व 45 विषम संख्या आहेत.
1 ते 100 मध्ये, 25 मूळ संख्या आहेत.
1 ते 100 मधे; जुळया मूळ संख्यांच्या आठ जोडया आहेत.
त्यापुढीलप्रमाणे 3 व 5
, 5 व 7 , 11 व 13
, 17 व 19 , 29 व 31
, 41 व 43 , 59 व 61
, 71 व 73.
-------------------------------
सोडविलेली उदाहरणे :-
(1) 1 ते 200 मध्ये दोनअंकी संख्या किती आहेत?
(1) 199 (2) 90 (3) 100 (4) 190
स्पष्टीकरण : एकूण 90 दोनअंकी संख्या आहेत. तीनअंकी संख्या 900 आहेत.
-------------------------------
(2) 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वांत लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती?
(1) 194 (2) 291 (3) 198 (4) 293 (2017)
स्पष्टीकरण : - 1 ते 100 संख्यात सर्वांत मोठी मूळ संख्या 97 व सर्वात लहान विषम मूळ संख्या - 3 ; 97 x 3 = 291
-------------------------------
(3) 51 ते 100 मध्ये 8 अंक किती वेळा येतो?
(1) 15 (2) 16 (3) 17 (4) 18
स्पष्टीकरण- 58, 68, 78, 80,
81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 98 मध्ये 8 हा अंक 15 वेळा येतो.
-------------------------------
(4) दोनअंकी समसंख्या किती आहेत?
(1) 50 (2) 45 (3) 90 (4) 40
स्पष्टीकरण- समसंख्या दोनअंकी 45 आहेत.
-------------------------------
(5) 0 हा अंक नसणाऱ्या दोनअंकी संख्या किती आहेत?
(1) 71 (2) 72 (3) 80 (4) 81
स्पष्टीकरण- दोनअंकी एकूण संख्या = 90 त्यापैकी
0 अंक असणाऱ्या संख्या = 9
0 अंक नसणाऱ्या संख्या = 90-9= 81
-------------------------------
No comments:
Post a Comment