दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन | Reading and writing numbers up to ten digits
दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन
संख्यालेखन करताना आपण दशमान पद्धतीचा वापर करतो.
एकक स्थानापासून डावीकडील प्रत्येक स्थान हे दहा पटीने वाढत जाते. खालील तक्त्याचे निरीक्षण करा.
गट
क्र. ५ |
गट क्र. ४ |
गट क्र. ३ |
गट
क्र. २ |
गट
क्र.१ |
|||||
अब्ज |
दश कोटी |
कोटी |
दश लक्ष |
लक्ष |
दश हजार |
हजार |
शतक |
दशक |
एकक |
वाचनाची पद्धत :
·
कोणत्याही संख्येचे वाचन करताना;
·
उजवीकडून गट करून वाचल्यास सोईचे जाते.
·
शतक, दशक, एकक हा गट क्र.
·
यानंतर डावीकडे 2- 2 स्थानांचा गट करावा.
उदा. 15,470
ही संख्या वाचताना पंधरा हजार चारशे सत्तर अशी वाचतात.
संख्यालेखन :
संख्या अंकात लिहिताना, प्रथम सर्वात मोठया स्थानावरील अंक लिहावा नंतर त्यापेक्षा लहान स्थानावर दिलेल्या संख्येतील योग्य अंक लिहावा.
एख्यादया स्थानावर अंक नसेल तर त्या स्थानावर '0' हा अंक लिहावा.
उदा.
सात कोटी तीनशे चौदा: या संख्येत;
कोटी स्थानावर 7 लिहून दशलक्ष, लक्, दशहजार, हजार या प्रत्येक स्थानांवर '0' लिहावे लागेल आणि मग
3, 1, 4
हे अंक अनुक्रमे श. , द. , ए. या स्थानी लिहावे.
याप्रमाणे संख्या अंकात लिहिण्याचा सराव करा.
उदा. 1) पाच अब्ज तेरा कोटी पंधरा लक्ष चोवीस हजार एकशे बारा ही संख्या अंकात लिहा.
उत्तर
: 5, 13, 15, 24,112
*****************
2) तीस कोटी तीस
उत्तर
: 30, 00,00,030
*****************
संख्यांमध्ये, डावीकडील प्रत्येक स्थान
10 पटीने वाढत जाते तर उजवीकडील प्रत्येक स्थान
10 पटीने कमी होत जाते.
उदा. 1 दशलक्ष = 1 लक्ष X 10
तसेच; 1
कोटी = 1 दशकोटी ÷ 10
सव्वा, साडे, पावणे
संख्या |
पाव भाग |
अर्धा भाग |
पाउण भाग |
100 |
25 |
50 |
75 |
1000 |
250 |
500 |
750 |
100000 |
25000 |
50000 |
75000 |
10000000 |
2500000 |
5000000 |
7500000 |
सोडविलेली उदाहरणे
१) ९०६६१५२४ या संख्येचे अचूक वाचन कसे कराल?
१)
नव्वद लक्ष सहासष्ट हजार पाचशे चोवीस
२)
नव्वद कोटी सहासष्ट हजार एक हजार पाचशे चोवीस
३)
नऊ कोटी सहा लक्ष एकसष्ट हजार पाचशे चोवीस
४) नऊ कोटी सहा लक्ष सहा हजार पाचशे चोवीस.
स्पष्टीकरण : दिलेली संख्या मांडणी करुन त्यात उजवीकडून शतक स्थानानंतर स्वल्पविराम द्यावा, त्यानंतर पुढे दोन-दोन स्थानानंतर स्वल्पविराम दिला असता वाचन अचूक होईल.
उदा. ९,०६,६१,५२४ या संख्येचे वाचन नऊ कोटी, सहालक्ष एकसष्ट हजार पाचशे चोवीस.
म्हणून पर्याय क्र. - ३ बरोबर
*****************
२) नऊ दशलक्ष नऊ ही संख्या अंकात लिहा (२०१८)
१) ९,००,००९
२)
९०,००,००९
३)
९,००,००,००९
४) ९०,००९
स्पष्टीकरण - नऊ दशलक्ष नऊ ही संख्या अंकात लिहिताना दिलेल्या संख्येत दशलक्ष आहे म्हणजे लक्षची दोन स्थाने त्यानंतर हजार दिले नाही म्हणून त्याच्या दोन स्थानात शून्य लिहावे लागेल.
शेवटी शतक, दशक, एकक यानुसार एककाच्या स्थानात ९ लिहिले तर शतक व दशक स्थानात शून्य लिहावे लागेल.
म्हणजेच ९०,००,००९ असे लेखन होईल.
पर्याय क्र. २ बरोबर
No comments:
Post a Comment