पदावली व अक्षरांचा वापर | Expression and the use of letters in place
of numbers
पदावली व अक्षरांचा वापर
■ गणिती क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार एकत्रितपणे पदावलीमध्ये दिलेल्या असतात.
■ दोनपेक्षा अधिक क्रिया एखादया उदाहरणात
असल्यास खालील पद्धतीने त्या कराव्यात त्याचा
क्रम असा असावा : कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी
दिलेल्या उदाहरणात कंस दिला असेल तर
त्या कंसातील रित प्रथम करावी. त्यानंतर डावीकडून प्रथम
गुणाकार किंवा भागाकार असेल तर प्रथम
करावा.
शेवटी डावीकडून बेरीज / वजाबाकी
करावी.
----------------------------------------------------
■ नमुना उदा.
35 ÷ 7 + 4
- ( 2 x 3 ) प्रथम
कंस सोडवावा.
25÷ 5 + 4 -
6 भागाकार
= 5 + 4 -
6 बेरीज
= 9 - 6 वजाबाकी
= 3
----------------------------------------------------
■ अक्षराचा वापर : गणितामध्ये कोणत्याही संख्येसाठी अक्षराचा वापर करून गुणधर्म सांगता येतात.
उदा. a x
0 = 0
■ याचाच अर्थ : कोणत्याही संख्येस शून्याने गुणले असता गुणाकार शून्य येतो
■ जेव्हा दोन पदावल्यांची किंमत समान
नसते, तेव्हा त्या दोन पदावल्यांमध्ये असमानता आहे असे म्हणतात.
■ कोणत्याही दोन संख्यांवर या क्रिया
केल्या असता येणारे उत्तर ही सुद्धा एक संख्याच असते.
■ नमुना प्रश्न
1) 7÷ 7
+ 7 x 7 - 7 चे सोपे रूप कोणते?
1) 1 2)
43 3) 41 4) 49
स्पष्टीकरण : पदावली सोडवण्यासाठी ' कचेभागुबेव ' या क्रमाचा उपयोग करू.
(
7÷ 7 )+ (7 x 7 )- 7 = 1 + 49 - 7 = 43 हे उत्तर मिळते
पर्याय क्र. 2 हे अचूक उत्तर आहे.
----------------------------------------------------
2)
K = 5 व M
=3 असेल
तर, 5 x K + M = किती ?
1)
20 2)
13 3) 28 4) 40
स्पष्टीकरण : अक्षराची किंमत घालून
पदावली सोडवावी.
5 x K + M = किती ?
= 5 x(5) + 3 =
= 25 + 3 = 28
पर्याय क्र. 3 हे अचूक उत्तर आहे.
No comments:
Post a Comment