संख्यांचा चढता व उतरता क्रम, तुलना | Ascending and descending order of numbers, comparison
संख्यांचा चढता व उतरता क्रम, तुलना
■ संख्याचा चढता व उतरता क्रम लावताना
आपल्याला त्या संख्याची तुलना करावी लागते.
■ चढता क्रम : - दिलेल्या संख्यांची चढत्या
क्रमाची मांडणी करताना क्रमाने लहान संख्येपासून मोठया संख्येपर्यंत केली
जाते.
उदा. - 7924, 9834, 3450, 2500 या संख्यांमधील सर्वात
डावीकडे असणारे अंक अनुक्रमे 7, 9, 3, व 2 हे आहेत यांपैकी 9 हा अंक सर्वांत मोठा असून 2 हा अंक सर्वांत लहान आहे. म्हणून 9834 ही संख्या सर्वांत मोठी
संख्या आहे आणि 2500 ही सर्वांत लहान संख्या
आहे.
चढता क्रम - 2500,
3450, 7924, 9834
----------------------------
■ उतरता क्रम :- दिलेल्या संख्यांची उतरत्या
क्रमाने मांडणी करताना क्रमाने मोठया संख्येपासून लहान संख्येपर्यंत केली
जाते.
उदा. 7924,
9834, 3450, 2500
उतरता क्रम - 9834,
7924, 3450, 2500
सर्वात डावीकडचे अंक समान
असल्यास डावीकडून दुस-या अंकांची तुलना करावी व संख्यांचा लहान- मोठेपणा
ठरवावा.
----------------------------
■ तुलना :- संख्यांचा लहान-मेाठेपणा
ठरविणे म्हणजे संख्यांची तुलना करणे होय.
तुलना करण्यासाठी <, >, = ही चिन्हे वापरतात.
----------------------------------------
■ चिन्हांचा अर्थ :-
1) < च्यापेक्षा मोठा
2) > च्यापेक्षा लहान
3) = समान
No comments:
Post a Comment