20 March 2021

 गुणाकार | Multiplication

 

गुणाकार | Multiplication

गुणाकार

गुणाकार - एकावरून अनेक वस्तूंची किंमत काढणेया क्रियेला गुणाकार म्हणतात

गुणाकार या क्रियेमध्ये गुण्य, गुणक गुणाकार हे घटक असतात.

गुण्य X गुणक = गुणाकार

   5785  X   5    =    28925

               गुण्य   = 5785

               गुणक  = 5

               गुणाकार28925

---------------------------------

 गुणाकाराचे नियम -

 कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार नेहमी शून्य येतो. 0 x 6

---------------------------------

 गुण्यगुणक गुणाकार यापैकी दोन घटक दिलेले असतात. तेव्हा तिसरा घटक काढता येतो.

---------------------------------

 कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या असते.  उदा  57x1 =57

---------------------------------

 कोणत्याही संख्येला 10, 100, 1000....... अशा म्हणजे एकावर शून्य असणा-या संख्यांनी गुणतानागुणाकारत गुण्य संख्या लिहून त्यापुढे गुणकातील शून्यांएवढी शून्ये लिहावीत

---------------------------------

 दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो.  या अंकांच्या गुणाकारातील एकक स्थानी जो अंक असतोतोच अंक मूळच्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतो.

---------------------------------

 दोन अंकांचा गुणाकार करताना , गुणाकारात कोणता विशिष्ट अंक एकक स्थानी येईल,  हे समजणे काही वेळा जरूरी असते.   अपेक्षित गुणाकार मिळण्यासाठी कोणते दोन अंक निवडायला हवेत,

---------------------------------

नमुना प्रश्न

1) 1) 100 रू च्या नोटांच्या बंडलामध्ये काही नोटा आहेत.  त्यांची एकूण किंमत किती असणार नाही?

 

1  1) 35000      2) 4900      3)  9400     4)  8540

 

स्पष्टीकरण :   100 रू. च्या नोटांची एकूण रक्कम मोजताना नोटांची संख्या x  100 असे करावे लागेल.

एकूण रक्कमेच्या दशक एकक स्थानी 00  असे अंक येतील

उत्तर पर्याय क्र. :  4  हे अचूक उत्तर आहे

---------------------------------

 2) एका रांगेत 215   या प्रमाणे 132   रांगामध्ये किती रोपे लावता येतील?

 1)  28280      2) 28380   3)  28340    4 )  27380

 स्पष्टीकरण :  एका रांगेत लावलेल्या रोपांच्या संख्येवरून अनेक रांगांत लावलेली एकूण रोपटयांची संख्या काढायची आहे म्हणजे  215  132    यांचा गुणाकार केला. गुणाकार 28380 आला.  ( गुणाकार पटकन करता यावा म्हणून त्यातील संख्यांची फोड केली. 

215 x 132  =  132 (200+15) = 132 x 200 + 132 x 15 = 26400 + 1980 = 28380

पर्याय क्र. : 2    हे अचूक उत्तर आहे

No comments:

Post a Comment

close